Thursday 14 February 2019

रेड रिबनच्या तीन सिंगल गाण्यांसह सेलिब्रेट करा आपला व्हॅलेंटाईन डे!



या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रेड रिबन म्युजिक लेबल आपल्यासाठी ३ रोमँटिक ट्रॅक घेऊन आले आहेत. यापैकी  'ये दिल दिवाना, माने ना' हे पहिले गाणे अनुराधा पौडवाल यांच्या मधुर स्वरांत स्वरबद्ध केलेले आहे. हे गाणे लक्ष्मी नारायण यांच्या लेखणीतून अवतरले असून त्यांनी ते संगीतबद्ध देखील केलेले आहे. अनुराधा पौडवाल फार उत्साहीत आहेत कारण बऱ्याच काळानंतर इतके सुंदर गाणे त्यांना गायला मिळाले आहे ज्यामध्ये त्या व्हिडीओ मध्ये देखील आढळून येणार आहेत.

रेड रिबन म्युजिक लेबल अंतर्गत 'ये मुझे क्या हुआ हैं|' हे दुसरे गाणे हरहुन्नरी व्यक्तित्व असणाऱ्या गायिका परफॉर्मर लालित्य मुंशॉ आणि ऐश्वर्या निगम यांनी गायले आहे. काशी कश्यप यांनी हे गाणे लिहिले असून पूजा नीलम कपूर यांनी ते संगीतबद्ध केलेले आहे. 'ये मुझे क्या हुआ हैं|' हे गाणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक अनोखी ट्रीट आहे. या गाण्याचा व्हिडिओ देखील अत्यंत नयनरम्य आहे. जो उत्तराखंडमधील हिमालय पर्वतांमध्ये डेहराडून येथील ऋषिकेश आणि मसूरी येथे चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडीओ मधून आपल्याला लालित्य मुंशॉ आणि रुबरू मिस्टर इंडिया २०१७ फेम कपिल गुजर  दिसून येतील.

लालित्य मुंशॉ यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले असून त्या एक अत्यंत प्रतिभाशाली गायिका, कलाकार आणि उद्योजिका आहेत. तर पूजा नीलम कपूर संगीत क्षेत्रातील प्रबळ व्यक्तित्व ओळखलं जातं. जागतिक विक्रमावर २८ विक्रम तिच्या नावावर नोंदविले गेले आहेत. इंडिअन टेली अकादमीने तिला यंगेस्ट अचिव्हर म्हणून सन्मानित केले आहे. तिला २०१५ व २०१६ अशा दोन्ही वर्षी प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असून डोळे बंद करून गाणे संगीतबद्ध करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.



'टूटा हूं बिखरा नहीं मैं' या तिसऱ्या गाण्यामध्ये अभिनेता आर्यन पंडित आढळून येईल. हे गाणे एक अतिशय प्रेमळ गाणे आहे. आर्यन एक दूरदर्शन अभिनेता आहे ज्याने हे गाणे लिहिले, तयार केले आणि स्वतः गायले देखील आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन समवेत 'मॉम' चित्रपट फेम वाणी सूड दिसून येणार असून व्हिडिओ हॅरीने दिग्दर्शित केलेला आहे.

रेड रिबन म्युजिक लेबल अंतर्गत ही सर्व विलक्षण गाणी आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार असून यावेळचा व्हॅलेंटाईन डे हा एकदम म्युजिकली असणार आहे.  

No comments:

Post a Comment